अंक फलकांमध्ये वाढत्या आकाराच्या अंकांसह ‘एल’ हे इनसेट अक्षर असलेल्या व इंटाग्लिओ छपाई नसलेल्या रु.20 च्या बँक नोटांचे वितरण |
डिसेंबर 04, 2016
अंक फलकांमध्ये वाढत्या आकाराच्या अंकांसह ‘एल’ हे इनसेट अक्षर असलेल्या व इंटाग्लिओ छपाई
नसलेल्या रु.20 च्या बँक नोटांचे वितरण
भारतीय रिझर्व बँक लवकरच, महात्मा गांधी मालिका-2005 मधील, दोन्हीही अंक फलकांमध्ये ‘एल’ हे इनसेट अक्षर असलेल्या व रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल ह्यांची सही असलेल्या, आणि मागील बाजूवर ‘2016’ हे छपाईचे वर्ष छापलेल्या रु.20 मूल्याच्या नोटा वितरीत करणार आहे.
ह्या बँक नोटांचे डिझाईन व सुरक्षा लक्षणे, आमच्या वृत्तपत्र निवेदन क्र. 2016-2017/1004 मध्ये दिल्यानुसार, आधीच्या महात्मा गांधी मालिका - 2005 नुसार व दोन्हीही अंक फलकांमध्ये वाढत्या आकाराचे अंक असलेले व इंटाग्लिओ छपाई नसलेले असेल.
ह्यापूर्वी ह्या बँकेने दिलेल्या रु.20 च्या सर्व बँक नोटा वैध चलन असणे सुरुच राहील
अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1402 |
|