डिसेंबर 04, 2016
दोन्हीही अंक फलकात वाढत्या आकाराचे अंक असलेल्या, इनसेट अक्षर नसलेल्या व इंटाग्लिओ
छपाई नसलेल्या रु.50 च्या बँक नोटांचे वितरण
भारतीय रिझर्व बँक लवकरच, महात्मा गांधी-2005 मालिकेमधील, दोन्हीही अंक फलकांमध्ये इनसेट अक्षर नसलेल्या, रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल ह्यांची सही असलेल्या आणि मागील बाजूवर ‘2016’ हे छपाईचे वर्ष छापलेल्या रु.50 मूल्याच्या बँक नोटा वितरित करणार आहे.
ह्या नोटांचे डिझाईन व सुरक्षा लक्षणे, ह्याआधी दिल्या गेलेल्या महात्मा गांधी मालिका-2005 प्रमाणे, दोन्हीही अंक फलकांमध्ये वाढत्या आकाराचे अंक व इंटाग्लिओ छपाई नसलेले, वृत्तपत्र निवेदन क्र.2016-2017/751 मार्फत दिल्यानुसार असेल.
ह्याआधी ह्या बँकेने दिलेल्या रु.50 च्या नोटा वैध चलन असणे सुरुच राहील.
अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1403 |