डिसेंबर 13, 2016
बल्ली को ऑपरेटिव बँक लि., बल्ली, हावरा, पश्चिम बंगाल
ह्यांच्यावरील निदेश आरबीआयकडून मागे
भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय), नोव्हेंबर 6, 2006 रोजीच्या निदेशान्वये, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35अ खाली, बल्ली सहकारी बँक लि., बल्ली, हावरा, पश्चिम बंगाल ह्यांना निदेश दिले होते. हे निदेश, नोव्हेंबर 14, 2006 रोजी व्यवहार बंद होण्यापासून वेळोवेळीच्या पुनरावलोकनाच्या अटीवर पुढील आदेश दिले जाई पर्यंत लागु होते.
जनतेच्या हितासाठी तसे करणे आवश्यक असल्याबाबत तिचे समाधान झाले असल्याकारणाने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 56 सह वाचित, कलम 35 अ च्या पोटकलम (2) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँक, येथे, डिसेंबर 7, 2016 पासून, बल्ली सहकारी बँक लि., बल्ली, हावरा, पश्चिम बंगाल ह्यांना तिने दिलेले निदेश मागे घेत आहे. तथापि वरील बँक, कार्यकारी सूचनांखाली तिचे कार्य करणे सुरुच ठेवील.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1505 |