डिसेंबर 14, 2016
सन्मित्र सहकारी बँक, मर्यादित मुंबई, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना
आरबीआयकडून मुदतवाढ
आमचे निदेश दि. जून 14, 2016 अन्वये, सन्मित्र सहकारी बँक मर्यादित मुंबई, महाराष्ट्र ह्यांना, जून 14, 2016 रोजी व्यवहार बंद झाल्यापासून, सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निदेशांखाली ठेवण्यात आले होते. आमचे सुधारित निदेश दि. डिसेंबर 7, 2016 अन्वये, ह्या निदेशांची वैधता, आणखी सहा महिन्यांनी, म्हणजे डिसेंबर 15, 2016 ते जून 14, 2017 पर्यंत पुनरावलोकनाच्या अटीवर वाढविण्यात आली आहे. संदर्भित निदेशातील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. वरील बदल अधिसूचित करण्यात आलेली, डिसेंबर 7, 2016 च्या निदेशांची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.
भारतीय रिझर्व बँकेने वरील सुधारणा केली ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा लावण्यात येऊ नये.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1523 |