डिसेंबर 19, 2016
बँकांनी 2005 पूर्व बँक नोटा ठेवी/जमामध्ये स्वीकाराव्यात - आरबीआयचे स्पष्टीकरण
भारतीय रिझर्व बँक येथे स्पष्ट करत आहे की, बँकांनी रु.500 व रु.1000 च्या 2005-पूर्व नोटा जमा/ठेवी म्हणून स्वीकाराव्यात, परंतु त्या पुनः (ग्राहकांना) देण्यात येऊ नयेत. ह्या नोटा केवळ रिझर्व बँकेच्या कार्यालयांमध्येच बदलून दिल्या जाऊ शकतील.
भारत सरकारने, राजपत्र अधिसूचना क्र. 2652 दि. नोव्हेंबर 8, 2016 अन्वये, भारतीय रिझर्व बँकेने दिलेल्या विद्यमान मालिकेतील रु.500 व रु.1000 च्या बँक नोटा (विहित बँक नोटा), वरील अधिसूचनेत दिलेल्या व्याप्ती पर्यंत, नोव्हेंबर 9, 2016 पासून वैध चलन असणे बंद झाले आहे. त्यामुळे, ह्या एसबीएनमध्ये, रु.500 व रु.1000 च्या 2005 पूर्व बँक नोटांचाही समावेश आहे.
वाणिज्य बँका, 2005-पूर्व नोटा स्वीकारत नसल्याबाबत, देशाच्या निरनिराळ्या भागातील जनतेकडून तक्रारी/प्रश्न येत असल्याने रिझर्व बँकेने हे स्पष्टीकरण दिले आहे. रिझर्व बँकेने असेही स्पष्ट केले आहे की, जून 30, 2016 रोजी तिने दिलेल्या सूचनांनुसार, 2005 पूर्व नोटा बदलून घेण्याची जनतेला दिलेली सुविधा, जुलै 1, 2016 पासून रिझर्व बँकेच्या पुढील कार्यालयांमध्येच देण्यात आली होती. ह्याचा अर्थ असा नव्हता की, ग्राहकांच्या खात्यात जमा करण्यासाठी बँका ह्या नोटांचा स्वीकार करणार नाहीत. 2005 पूर्व बँक नोटा बदलून घेण्याची सुविधा, रिझर्व बँकेच्या पुढील कार्यालयात उपलब्ध आहे - अहमदाबाद, बंगळुरु, बेलापुर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगढ, चेन्नई, गुवाहाटी, हैद्राबाद, जयपुर, जम्मु, कानपुर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपुर, नवी दिल्ली, पाटणा, तिरुवनंतपुरम आणि कोची.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1565 |