डिसेंबर 19, 2016
‘आर’ ह्या इनसेट अक्षरासह रु.500 च्या बँक नोटांचे वितरण
सध्या एक वैध चलन म्हणून असलेल्या, महात्मा गांधी मालिके (नवी) मधील रु.500 मूल्याच्या बँक नोटा वितरित करत असतानाच, दोन्हीही अंक फलकांमध्ये ‘आर’ हे इनसेट अक्षर असलेल्या, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, डॉ. उर्जित आर पटेल ह्यांची सही असलेल्या व नोटांच्या मागील बाजूवर, ‘2016’ हे छपाईचे वर्ष छापलेल्या बँक नोटांची एक नवीन बॅच वितरित करण्यात येत आहे.
ह्या नोटांचे डिझाईन, आमचे वृत्तपत्र निवेदन क्र. 2016-2017/1461 दि. डिसेंबर 8, 2016 मार्फत अधिसूचित केल्यानुसार, सर्व बाबतीत, महात्मा गांधी मालिका (नवी) मधील रु.500 च्या बँक नोटांप्रमाणेच आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1576 |