नोव्हेंबर 26, 2016
तरलता स्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी आरबीआयकडून उपाय घोषित
नोव्हेंबर 9, 2016 पासून रु.500 व रु.1000 मूल्याच्या बँक नोटांचे (ह्यापुढे ह्यांना विहित बँक नोटा - एसबीएन म्हटले आहे) वैध चलन लक्षण काढून घेतल्यामुळे, बँक कर्जाच्या तुलनेने ठेवींमध्ये एकाएकी वाढ झाली आहे व त्यामुळे प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिरिक्त तरलता निर्माण झाली आहे. बँकिंग प्रणालीकडे उपलब्ध असलेल्या अतिरिक्त तरलतेचे आकारमान पुढील काही पंधरवड्यांमध्ये आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. हे विचारात घेता असे ठेरविण्यात आले आहे की, केवळ तात्पुरता उपाय म्हणून, रोख-राखीव निधी गुणोत्तरात (सीआरआर) थोडीशी वाढ लागु करुन ह्या वाढलेल्या तरलतेचा काही भाग पुढीलप्रमाणे समावून घ्यावा.
(अ) आऊट स्टँडिंग नेट डिमांड व टाईम लायाबिलीटीजच्या (एनडीटीएल) 4 टक्के एवढा सीआरआर कायम न बदललेला राहील.
(ब) सप्टेंबर 16, 2016 ते नोव्हेंबर 11, 2016 दरम्यान एनडीटीएलमध्ये झालेल्या वाढीवर, नोव्हेंबर 26, 2016 रोजी सुरु झालेल्या पंधरवड्यापासून, अनुसूचित बँका 100 टक्के वाढीव सीआरआर ठेवतील. बँकिंग प्रणालीत ह्या एसबीएन परत आल्यामुळे निर्माण झालेल्या अतिरिक्त तरलतेचा काही भाग समावून घेण्यासाठी हे केले आहे; तर अर्थसंस्थेच्या उत्पादक क्षेत्रांच्या कर्ज-गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांकडे पुरेशी तरलता शिल्लक राहील. प्रणालीमधील अतिरिक्त तरलता बाहेर वाहून जाण्यासाठी, रिझर्व बँकेच्या तरलता व्यवस्थापन साचामधील, हा वाढीव सीआरआर हा एक तात्पुरता उपाय असल्याने, त्याचे पुनरावलोकन, डिसेंबर 9, 2016 किंवा त्यापूर्वी केले जाईल.
(क) रिझर्व बँक किंवा करन्सी चेस्टमध्ये एसबीएनच्या शिल्लका जमा करुन मूल्ये घेण्याची हमी योजना, रिझर्व बँकेने वेगळ्याने पुनरुज्जीवित केली आहे. ह्या उपायामुळे, वाढीव सीआरआरचे अनुपालन करण्यास बँकांनाही मदत होईल.
कार्यकारी तपशील वेगळ्याने दिलेल्या एका परिपत्रकात दिला आहे.
अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1335 |