Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (82.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 21/12/2016
आरबीआयकडून पाच अधिकृत डीलर बँकांना आर्थिक दंड लागु

डिसेंबर 21, 2016

आरबीआयकडून पाच अधिकृत डीलर बँकांना आर्थिक दंड लागु

विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम, 1999 च्या (फेमा) अहवाल पाठविण्याच्या आवश्यकतांवरील भारतीय रिझर्व बँकेच्या सूचनांचे उल्लंघन केले असल्याकारणाने पुढील पाच बँकांना भारतीय रिझर्व बँकेने दंड ठोठावला आहे. दंडाच्या रकमेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

अनुक्रमांक बँकेचे नाव दंडाची रक्कम (रु. मध्ये).
1. बँक ऑफ अमेरिका 10,000
2. बँक ऑफ टोकियो, मित्सुबिशी 10,000
3. डॉयश बँक 20,000
4. दि रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड 10,000
5. स्टॅडंर्ड चार्टर्ड बँक 10,000

भारतीय रिझर्व बँकेने वेळोवेळी दिलेल्या सूचना/निदेश/मार्गदर्शक तत्वांचे केलेले उल्लंघन विचारात घेऊन, फेमा 1999 च्या कलम 11(3) च्या तरतुदींखाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने हे दंड ठोठावले आहेत.

रिझर्व बँकेने वरील बँकांना कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या होत्या व त्यांच्या उत्तरादाखल, वरील बँकांनी त्यांची लेखी उत्तरे व मौखिक सादरीकरणेही सादर केली होती. ह्या प्रकरणांमधील सत्य गोष्टींचा विचार करुन रिझर्व बँक ह्या निर्णयाप्रत आली की उल्लंघने झाली असून दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1604

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä