Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (99.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 29/12/2016
इनसेट अक्षर नसलेल्या, अंक-फलकांमध्ये वाढत्या आकाराचे अंक असलेल्या आणि इंटाग्लिओ छपाई नसलेल्या रु.20 च्या बँक नोटांचे वितरण

डिसेंबर 29, 2016

इनसेट अक्षर नसलेल्या, अंक-फलकांमध्ये वाढत्या आकाराचे अंक असलेल्या आणि इंटाग्लिओ छपाई नसलेल्या रु.20 च्या बँक नोटांचे वितरण

भारतीय रिझर्व बँक लवकरच, दोन्हीही अंक-फलकांमध्ये इनसेट अक्षर नसलेल्या व भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल ह्यांची सही असलेल्या आणि मागील बाजूवर ‘2016’ हे छपाईचे वर्ष छापलेल्या, महात्मा गांधी मालिका - 2005 मधील, रु.20 मूल्याच्या बँक नोटा वितरित करणार आहे.

आता देण्यात येणा-या ह्या बँक नोटांचे डिझाईन व सुरक्षा लक्षणे ही, वृत्तपत्र निवेदन क्र. 2016-2017/1402 दि. डिसेंबर 4, 2016 अन्वये प्रसिध्द केल्यानुसार, दोन्हीही अंकफलकात वाढत्या आकाराचे अंक असलेल्या, इंटाग्लिओ छपाई नसलेल्या व अलिकडेच देण्यात आलेल्या, महात्मा गांधी मालिका - 2005 मधील रु.20 च्या बँक नोटांप्रमाणेच असेल.

ह्या बँकेने, ह्यापूर्वी दिलेल्या रु.20 मूल्याच्या बँक नोटा वैध चलन असणे सुरुच राहील.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1700

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä