डॉ. विरल व्ही आचार्य ह्यांची भारतीय रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नेमणुक |
डिसेंबर 28, 2016
डॉ. विरल व्ही आचार्य ह्यांची भारतीय रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नेमणुक
केंद्र सरकारने, अधिसूचना एफ क्र.7/1/2012-बीओ-आय(पीटी)दि. डिसेंबर 28, 2016 अन्वये, डॉ. विरल व्ही आचार्य, ह्यांची (सध्या स्टार प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स, वित्त विभाग, न्युयॉर्क विश्व विद्यालय - स्टर्न स्कूल ऑफ बिझिनेस) (सोबत रेझ्युमी दिला आहे) त्यांनी पदभार स्वीकारण्याच्या तारखेपासून तीन वर्षांच्या मुदतीसाठी, भारतीय रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नेमणुक केली आहे. डॉ. आचार्य जानेवारी 20, 2017 रोजी रुजु होतील.
डेप्युटी गव्हर्नर म्हणून डॉ. आचार्य, नाणेविषयक धोरण व संशोधन समूहाचे काम पाहतील.
जोस जे कत्तुर
मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1685 |
|