Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (106.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 31/12/2016
विदेशात गेलेले नागरिक व एनआरआय ह्यांच्यासाठी एसबीएन बदलून घेण्यासाठी आरबीआयने दिलेली सुविधा

डिसेंबर 31, 2016

विदेशात गेलेले नागरिक व एनआरआय ह्यांच्यासाठी एसबीएन बदलून घेण्यासाठी आरबीआयने दिलेली सुविधा

नोव्हेंबर 9, 2016 ते डिसेंबर 30, 2016 दरम्यान विदेशात असलेले नागरिक व अनिवासी भारतीय (एनआरआय) नागरिक ह्यांना, भारतीय रिझर्व बँकेने, विहित बँक नोटा (एसबीएन) बदलून देण्याची सुविधा देऊ केली आहे.

नोव्हेंबर 9, 2016 ते डिसेंबर 30, 2016 ह्यादरम्यान विदेशात असलेले निवासी भारतीय नागरिक ह्या सुविधेचा लाभ मार्च 31, 2017 पर्यंत घेऊ शकतात, आणि नोव्हेंबर 9, 2016 ते डिसेंबर 30, 2016 ह्या दरम्यान विदेशात असलेले अनिवासी भारतीय नागरिक ह्या सुविधेचा लाभ, जून 30, 2017 पर्यंत घेऊ शकतात.

अशी अदलाबदल करण्यासाठी पात्र निवासी भारतीयांसाठी कोणतीही मर्यादा नसली तरी, एनआरआय व्यक्तींसाठी ती फेमा विनियमांनुसार असेल. असे एनआरआय स्वतःच्या वैय्यक्तिक क्षमतेत, ह्या सुविधेचा लाभ, ह्या कालावधीमध्ये एकदाच, आणि आधार क्रमांक, पर्मनंट अकाऊंट नंबर (पॅन) इत्यादि सादर करुन, तसेच वरील कालावधीमध्ये ते विदेशात होते ह्याचा पुरावा आणि ही अदलाबदलीची सुविधा पूर्वी घेतली नव्हती ह्याबाबतचे पुरावे आणि एनआरआयद्वारे एसबीएन आयात केल्याबाबतचे कस्टम्सचे प्रमाणपत्र इत्यादि सादर करुन घेऊ शकतात. ह्या सुविधेखाली तृतीय पक्षाने केलेले सादरीकरण स्वीकारले जाणार नाही.

ह्या अटी व शर्ती पूर्ण केल्यावर, व सादर केलेल्या एसबीएनचा खरेपणा तपासल्यानंतर, परवानगीप्राप्त असलेली रक्कम, सादरर्कत्याच्या, केवायसी निकष पूर्ण केले असलेल्या खात्यात जमा केली जाईल.

ही सुविधा, निवासी व्यक्तींसाठी, जानेवारी 2, 2017 ते मार्च 31, 2017 पर्यंत, आणि एनआरआय साठी जानेवारी 2, 2017 ते जून 30, 2017 पर्यंत उपलब्ध असेल.

रिझर्व बँकेच्या मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता व नागपुर येथील कार्यालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध असेल.

नेपाळ, भूतान, पाकीस्तान व बांगलादेश येथे राहणा-या भारतीय नागरिकांना ही सुविधा उपलब्ध नसेल.

रिझर्व बँकेच्या ह्या निर्णयामुळे त्रास झालेली कोणतीही व्यक्ती, तिला असे नाकारण्यात आल्याबाबत कळविल्यापासून चौदा दिवसांच्या आत, रिझर्व बँकेच्या केंद्रीय मंडळाकडे अपील करु शकते. अशी सादरीकरणे, केंद्रीय मंडळ, भारतीय रिझर्व बँक, सचिव विभाग, केंद्रीय कार्यालय बिल्डिंग, 16 वा मजला, शहीद भगतसिंग मार्ग, मुंबई - 400001 ह्यांचेकडे पाठवावीत.

ह्या सुविधेबाबतची अधिक माहिती आरबीआयच्या वेबसाईटवर https://rbi.org.in/ दिली आहे.

ही सुविधा, अधिसूचना एसओ 4251(ई) दि. डिसेंबर 30, 2016 सह वाचित, भारत सरकारच्या, डिसेंबर 30, 2016 रोजीच्या विहित बँक नोटा (दायित्वाची समाप्ती) वटहुकुम, 2016 च्या कलम 4(1) अनुसार सुरु करण्यात आली आहे.

अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1728

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä