Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (62.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 04/01/2017
अमानाथ सहकारी बँक लि., बंगळुरु ह्यांना दिलेल्या सूचनांना आरबीआयकडून मुदतवाढ

जानेवारी 04, 2017

अमानाथ सहकारी बँक लि., बंगळुरु ह्यांना दिलेल्या सूचनांना आरबीआयकडून मुदतवाढ

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, अमानाथ सहकारी बँक लि., बंगळुरु ह्यांना, एप्रिल 1, 2013 रोजी दिलेल्या (व त्यानंतरही देण्यात आलेल्यांसह वाचित) निदेशांचा (शेवटचा निदेश जून 29, 2016 रोजी) कार्यकारी कालावधी, जनतेच्या हिताच्या दृष्टीने वाढविणे आवश्यक असल्याबाबत तिचे समाधान झाल्याकारणाने, भारतीय रिझर्व बँकेने ह्या निदेशाचा कार्यकाल आणखी सहा महिन्यांसाठी वाढविला आहे.

त्यानुसार, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 35 अ च्या पोटकलम (1) ने तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँक येथे निदेश देत आहे की, अमानाथ सहकारी बँक लि., बंगळुरु ह्यांना दिलेले व वेळोवेळी सुधारित केलेले, एप्रिल 1, 2013 चे निदेश (ज्यांची वैधता अखेर जानेवारी 4, 2017 पर्यंत वाढविण्यात आली होती), जानेवारी 5, 2017 ते जुलै 4, 2017 पर्यंत असे आणखी सहा महिन्यांसाठी पुनरावलोकनाच्या अटीवर वरील बँकेला लागु असणे सुरुच राहील.

संदर्भित निदेशामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.

आरबीआयने वरील निदेश दिले ह्याचा अर्थ, आरबीआयने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा समजण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवहार करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निदेशामध्ये बदल करण्याचा विचार आरबीआय करु शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1774

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä