जानेवारी 05, 2017
विहित बँक नोटांबाबत (एसबीएन) स्पष्टीकरण
निरनिराळ्या विभागांमध्ये सादर करण्यात आलेल्या एसबीएनबाबत निरनिराळे अंदाज होते.
येथे आम्ही स्पष्ट करु इच्छितो की, आम्ही नियतकालिकतेने प्रसृत केलेले एसबीएनचे आकडे हे, देशभरातील मोठ्या संख्येने असलेल्या धन-कोषांमध्ये केलेल्या नोंदीच्या एकत्रीकरणावर आधारित होते. आता, डिसेंबर 30, 2016 रोजी ही योजना समाप्त झाल्याने, लेखांमधील चुका/शक्य असलेली शंकास्पद मोजणी काढून टाकण्यासाठी, ह्या आकड्यांचा मेळ प्रत्यक्ष रोख शिल्लकांशी घालणे आवश्यक आहे. आरबीआयने ही प्रक्रिया सुरु केली असून, ती पूर्ण होईपर्यंत, परत आलेल्या एसबीएनच्या एकूण संख्येचा अंदाज निर्देशित करता येत नाही. मिळालेल्या एसबीएनचे निश्चित आकडे, लवकारात लवकर प्रसृत करण्यासाठी, ही प्रक्रिया जलदतेने करण्यासाठी आरबीआय सर्व उपाय योजत आहे.
जोस जे कत्तुर
मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1783 |