जानेवारी 06, 2017
ब्रम्हावर्त वाणिज्य सहकारी बँक लि., कानपुर, उत्तर प्रदेश ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ
ब्रम्हावर्त वाणिज्य सहकारी बँक लि., कानपुर, उत्तर प्रदेश ह्यांना देण्यात आलेल्या निदेशांना, रिझर्व बँकेने, जानेवारी 7, 2017 ते जुलै 6, 2017 पर्यंत अशी सहा महिन्यांची मुदतवाढ पुनरावलोकनाच्या अटीवर दिली आहे. वरील बँक, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ खाली देण्यात आलेल्या निदेशांखाली, जुलै 7, 2015 पासून होती. वरील निदेशांमध्ये बदल/सुधारणा केली जाऊन त्याची वैधता जानेवारी 6, 2017 पर्यंत वाढविण्यात आली होती. डिसेंबर 30, 2016 च्या निदेशान्वये ही मुदत जाऊन ती जुलै 6, 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे. डिसेंबर 30, 2016 च्या निदेशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.
वरील निदेशात रिझर्व बँकेने बदल केला ह्याचा अर्थ, ह्या बँकेच्या वित्तीय परिस्थितीत सुधारणा किंवा घट झाली आहे असा लावण्यात येऊ नये. परिस्थितीवर अवलंबून ह्या निदेशात सुधारणा/बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1807 |