डिसेंबर 07, 2016
आरबीआयकडून वाढीव सीआरआर मागे
नोव्हेंबर 26, 2016 रोजी रिझर्व बँकेने, सप्टेंबर 16, 2016 व नोव्हेंबर 11, 2016 दरम्यानच्या, अनुसूचित बँकांच्या, नेट डिमांड व टाईम लायाबिलिटीज (एनडीटीएल) मधील 100 टक्के वाढीचा वाढीव कॅश रिझर्व रेशो (सीआरआर) मध्यरात्री नोव्हेंबर 26, 2016 पासून घोषित केला होता. रु.500 व रु.1000 च्या बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून घेण्यात आल्यामुळे, प्रणालीमधील लिक्विडीटीच्या मोठ्या वाढीचा एक भाग समावून घेणे हा त्यामागील हेतु होता. असेही निर्देशित करण्यात आले होते की, हा वाढीव सीआरआर फक्त एक तात्पुरता उपाय असून त्याचे डिसेंबर 9, 2016 रोजी किंवा त्यापूर्वीही पुनरावलोकन केले जाईल.
मार्केट स्टेबिलायझेशन योजनेखालील (एमएसएस) सिक्युरिटीज देण्यासाठीची मर्यादा (सीलिंग) रु.6000 बिलियन अशी वाढविण्यात आली असल्याने, डिसेंबर 10, 2016 रोजी सुरु होणा-या पंधरवड्यापासून हा वाढीव सीआरआर मागे घेण्यात यावा असे ठरविण्यात आले आहे. हा वाढीव सीआरआर खंडीत केल्यामुळे निर्माण झालेली तरलता (लिक्विडीटी), एमएसएस देणे व तरलता समायोजन सुविधा (एलएएफ) कार्यकृती ह्यांचे मिश्रण करुन समावून घेतली जाईल.
अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1443 |