डिसेंबर 15, 2016
केंद्रीय मंडळाची 562वी सभा
भारतीय रिझर्व बँकेच्या केंद्रीय मंडळाची 562वी सभा, गुरुवार दि. डिसेंबर 15, 2016 रोजी कोलकाता येथे संपन्न झाली. ह्या सभेचे अध्यक्षस्थान रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल ह्यांनी भूषविले होते. ह्याशिवाय, ह्या सभेमध्ये, भारतीय रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर्स श्री. आर गांधी, श्री. एस एस मुंद्रा आणि श्री. एन एस विश्वनाथन तसेच भारतीय रिझर्व बँकेच्या केंद्रीय मंडळाचे इतर संचालक श्री. नटराजन चंद्रशेखरन, श्री. भरत दोशी आणि श्री. सुधीर मनकड हे देखील उपस्थित होते. ह्या केंद्रीय मंडळावरील सरकारी नामनिर्देशीत संचालिका म्हणून, श्रीमती अंजुली छिब दुग्गल, सचिव, वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालय, ह्या देखील उपस्थित होत्या.
ह्या मंडळाकडून विद्यमान आर्थिक परिस्थिती, जागतिक व देशांतर्गत आव्हाने आणि भारतीय रिझर्व बँकेची काही विशिष्ट कार्यक्षेत्र ह्यांचे पुनरावलोकन करण्यात आले.
त्यानंतर, गव्हर्नरांनी पश्चिम बंगालच्या माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रदेश-निहाय प्रश्नांवर चर्चा केली.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1539 |