डिसेंबर 22, 2016
ठेवीदार जाणीव कार्यक्रमासाठी आरबीआयच्या डीईए निधी समितीकडून
आणखी पाच संस्थांना मंजुरी
आरबीआयकडून आज, ठेवीदार शिक्षण व जाणीव (डीईए) समितीने मंजुर केलेल्या पाच अतिरिक्त संस्थांची नावे, पंजीकरण करण्यासाठी प्रसृत केली आहेत. मंजुरीप्राप्त पाच संस्थांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
अनु क्र. |
अर्जदाराचे नाव |
1. |
ग्लोबल अलायन्स फॉर सस्टेनेबल डेवलपमेंट |
2. |
क्रिसील फाऊंडेशन |
3. |
उपभोक्ता मार्गदर्शन समिती (युएमएएस) जोधपुर |
4. |
दि इंस्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया |
5. |
मदर स्वयंसेवा ग्रामीण अभिवृध्दी (आर) समस्थे. |
भारतीय रिझर्व बँकेने, पंजीकृत संस्थांनाही, ह्या निधीमधून प्रकल्प संबंधित वित्तीय सहाय्य मिळविण्यासाठी, तिच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या नमुन्यात संबंधित माहिती/कागदपत्र ह्यासह अर्ज करण्यास सांगितले आहे.
निवड प्रक्रियेमध्ये, रिझर्व बँकेच्या अंतर्गत गटाने केलेली छाननी आणि डीईए निधी समितीद्वारा करण्यात येणारे अर्जाचे मूल्यमापन ह्यांचा समावेश होता. ह्या समितीत तीन बाह्य सभासद आहेत. ह्या अर्जदारांची निवड, पात्रतेच्या किमान निकषांची पूर्तता, मागील कामगिरी, आणि ठेवीदार-शिक्षण, ग्राहक-जाणीव, ग्राहक संरक्षण ह्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचे मूल्यमापन आणि ठेवीदार जाणीव कार्यक्रम राबविण्यामधील क्षमता ह्यांच्या आधारावर करण्यात आली आहे.
येथे स्मरण व्हावे की, भारतीय रिझर्व बँकेने, ऑक्टोबर 1, 2015 रोजी, डीईए निधीमधून वित्तीय सहाय्य मिळविण्यासाठी आलेल्या 20 संस्थांचे, त्यांच्या अर्जांवर आधारित पंजीकरण केले होते. ह्या बँकेच्या वृत्तपत्र निवेदन दि. ऑक्टोबर 8, 2015 मार्फत पंजीकरण करण्यासाठी तिने अर्हता प्राप्त व्यक्तींकडून अर्जांची दुसरी फेरी आवाहित केली होती.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1618 |