डिसेंबर 26, 2016
घराघरामधील महागाई-अंदाजाच्या सर्वेक्षणाचा डिसेंबर 2016 च्या फेरीची आरबीआयकडून सुरुवात
घराघरामधील महागाई-अंदाजांचे सर्वेक्षण भारतीय रिझर्व बँक नियमितपणे करत आली आहे. डिसेंबर 2016 फेरीसाठीचे सर्वेक्षण आता 18 शहरांमध्ये (अहमदाबाद, बंगळुरु, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगढ, चेन्नई, दिल्ली, गुवाहाटी, हैद्राबाद, जयपुर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपुर, पाटणा, रायपुर, रांची आणि तिरुवनंतपुरम) सुरु करण्यात येत आहे. सर्वेक्षणातून, पुढील तीन महिन्यात तसेच पुढील एक वर्षात, किंमतीत/दरात होणा-या बदलांवरील (सर्वसाधारण किंमती तसेच विशिष्ट उत्पाद गटाच्या किंमती) घराघरांमधून मिळणारा गुणात्मक प्रतिसाद, आणि सध्याच्या तसेच पुढील तीन महिन्यातील व पुढील एक वर्षातील संभाव्य महागाईवरील संख्यात्मक प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे. ह्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांमुळे उपयुक्त अशी धोरणात्मक माहिती मिळते. सर्वेक्षणामधून मिळालेल्या महागाईबाबतच्या अपेक्षा ह्या घराघरातून केलेली विषयात्मक मूल्यमापने असतात आणि ती, घराघरातील वैय्यक्तिक वापरावर आधारित असतात.
भारतीय रिझर्व बँकेच्या वतीने मे. हंसा रिसर्च ग्रुप लि., मुंबई ह्यांना, ही सर्वेक्षणाची फेरी करण्यासाठी नेमण्यात आले आहे. ह्यासाठी, ही एजन्सी घराघरात जाईल आणि निवडक कुटुंबांना त्यांचा प्रतिसाद देण्याची विनंती करील. ज्यांच्याकडे ही एजन्सी गेली नाही अशा व्यक्तीही, लिंक्ड सर्व्हे शेड्युल (फॉर्म्स-सर्व्हे) चा उपयोग करुन त्यांचे प्रतिसाद देऊन, ह्या सर्वेक्षणात भाग घेऊ शकतात. भरण्यात आलेले हे सर्व्हे शेड्युल, खाली दिलेल्या संपर्क माहितीनुसार ई-मेलने पाठविले जाऊ शकतात. काही प्रश्न/स्पष्टीकरणासाठी, कृपया पुढील पत्त्यावर संपर्क करावा.
संचालक, डिव्हिजन ऑफ हाऊसहोल्ड र्सव्हेज, सांख्यिकी व माहिती व्यवस्थापन विभाग, भारतीय रिझर्व बँक, सी-8, 6 वा मजला, बांद्रा-कुर्ला काँप्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - 400051. फोन 022-26578398, 022-26578332, फॅक्स - 022-26571327. ई-मेल पाठविण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1650 |