जानेवारी 03, 2017
श्रीमती सुरेखा मरांडी ह्यांची आरबीआयकडून नवीन ईडी म्हणून नेमणुक
डिसेंबर 31, 2016 रोजी सेवानिवृत्त झालेल्या श्री. यु एस पालीवाल ह्यांच्या सुपर अॅन्युएशन नंतर, भारतीय रिझर्व बँकेने, श्रीमती सुरेखा मरांडी ह्यांची कार्यकारी संचालिका म्हणून नेमणुक केली आहे. जानेवारी 2, 2017 रोजी श्रीमती मरांडी ह्यांनी पदभार स्वीकारला.
कार्यकारी संचालिका म्हणून श्रीमती मरांडी, ग्राहक शिक्षण व संरक्षण विभाग, वित्तीय समावेशन व विकास विभाग आणि सचिव-विभाग ह्यांचे काम पाहतील. युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बरोडाच्या संचालक मंडळांमध्येही त्यांनी काम केले आहे.
ईडी म्हणून बढती मिळण्यापूर्वी, श्रीमती मरांडी रिझर्व बँकेत मुख्य महाव्यवस्थापक व मुख्य दक्षता अधिकारी होत्या. गेल्या तीन वर्षांमध्ये श्रीमती मरांडी ह्यांनी, रिझर्व बँकेच्या, विनियामक व पर्यवेक्षकीय, वित्तीय समावेशन व विकास आणि मानवी स्त्रोत व्यवस्थापन ह्या क्षेत्रात काम केले आहे. श्रीमती मरांडी ह्यांनी जोधपुर विश्व विद्यालयाची मास्टर्स पदवी प्राप्त केली आहे.
अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1757 |