जानेवारी 27, 2017
दि. महामेधा नागरी सहकारी बँक लि., गाझियाबाद, उत्तर प्रदेश ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ.
महामेधा नागरी सहकारी बँक लि., गाझियाबाद, उत्तर प्रदेश ह्यांना दिलेल्या निदेशांना रिझर्व बँकेने जानेवारी 30, 2017 ते जुलै 29, 2017 पर्यंत अशी सहा महिन्यांची मुदतवाढ पुनरावलोकनाच्या अटीवर दिली आहे. वरील बँक, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ खाली दिलेल्या निदेशांखाली जुलै 29, 2016 पासून होती. जानेवारी 23, 2017 रोजीच्या निदेशान्वये ह्या निदेशांची मुदत जुलै 29, 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे. जानेवारी 23, 2017 च्या निदेशाची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आली आहे.
रिझर्व बँकेने निदेशांमध्ये बदल केला ह्याचा अर्थ, ह्या बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा किंवा घट झाली आहे असा घेण्यात येऊ नये. परिस्थितीवर अवलंबून ह्या निदेशांमध्ये बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.
अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2019 |