Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (95.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 27/01/2017
हरदोई अर्बन को ऑपरेटिव बँक लि., उत्तर प्रदेश ह्यांना दिलेल्या निदेशांना, आरबीआयकडून मुदतवाढ

जानेवारी 27, 2017

हरदोई अर्बन को ऑपरेटिव बँक लि., उत्तर प्रदेश ह्यांना दिलेल्या निदेशांना, आरबीआयकडून मुदतवाढ

हरदोई को ऑपरेटिव बँक लि., हरदोई, उत्तर प्रदेश ह्यांना देण्यात आलेल्या निदेशांना भारतीय रिझर्व बँकेने, पुनरावलोकनाच्या अटीवर आणखी सहा महिन्यांची (जानेवारी 30, 2017 ते जुलै 29, 2017) मुदतवाढ दिली आहे. वरील बँक, जुलै 29, 2016 पासून, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35 अ खाली देण्यात आलेल्या निदेशांखाली होती. जानेवारी 23, 2017 च्या निदेशान्वये, हा कालावधी जुलै 29, 2017 पर्यंत वाढविण्यात आला आहे. जानेवारी 23, 2017 च्या निदेशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

रिझर्व बँकेने निदेशांमध्ये बदल केला ह्याचा अर्थ, ह्या बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा किंवा घट झाली आहे असा घेण्यात येऊ नये. परिस्थितीवर अवलंबून ह्या निदेशांमध्ये बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2020

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä