बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 22 व 36 (अ)(2) खाली भारतामध्ये बँकिंग व्यवसाय करण्यासाठीच्या परवान्याचे रद्दीकरण आणि नागरी सहकारी बँकेचे सहकारी सोसायटी मध्ये रुपांतरण - स्टेट ट्रान्सपोर्ट एम्प्लॉईज को.ऑपरेटिव बँक लि., अहमदाबाद (गुजराथ) |
फेब्रुवारी 8, 2017
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 22 व 36 (अ)(2) खाली भारतामध्ये बँकिंग व्यवसाय करण्यासाठीच्या परवान्याचे रद्दीकरण आणि नागरी सहकारी बँकेचे सहकारी सोसायटी मध्ये रुपांतरण - स्टेट ट्रान्सपोर्ट एम्प्लॉईज को.ऑपरेटिव बँक लि., अहमदाबाद (गुजराथ)
जनतेच्या माहितीसाठी येथे सांगण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व बँकेचे आदेश दि. जानेवारी 13, 2017 अन्वये, स्टेट ट्रान्सपोर्ट एम्प्लॉईज को. ऑपरेटिव बँक लि., अहमदाबाद (गुजराथ) ह्यांचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. त्यानुसार, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 5 (सीसीआय) मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे वरील बँक एक ‘सहकारी बँक’ असणे समाप्त झाले आहे. आणि वरील सहकारी बँकेला, वरील अधिनियमाच्या सर्व तरतुदी लागु होणेही समाप्त झाले आहे. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 56 सह वाचित कलम 22 खाली दिल्यानुसार, वरील बँकेला, भारतात बँकिंग व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 5(ब) मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे बँकिंग चा व्यवसाय करण्यास (ठेवींचा स्वीकार/नूतनीकरण ह्यासह) वरील बँकेवर प्रतिबंध घालण्यात आला आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2134
|
|