Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (311.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 16/02/2017
आय कराची थकबाकी आधीच, आरबीआय किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये जमा करा - मार्च 2017

फेब्रुवारी 16, 2017

आय कराची थकबाकी आधीच, आरबीआय किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये जमा करा - मार्च 2017

भारतीय रिझर्व बँकेने आय कर निधीरितींना विनंती केली आहे की, त्यांनी त्यांच्या आय कराची थकबाकी ठरविण्यात आलेल्या तारखेच्या पुरेशा आधीच जमा करावी. असेही सांगण्यात आले की, करनिधीरिती त्यासाठी, एजन्सी बँकांच्या निवडक शाखा किंवा त्या बँकांनी देऊ केलेली, ऑनलाईन कर प्रदानाची सुविधा ह्यासारख्या पर्यायी वाहिन्यांचाही उपयोग करु शकतात. ह्यामुळे, रिझर्व बँकेच्या कार्यालयामध्ये लांबलचक रांगांमध्ये उभे राहण्याची असुविधा टाळता येईल.

असे दिसून आले आहे की, भारतीय रिझर्व बँकेच्या मार्फत आय कर थकबाकी भरण्यासाठी दर वर्षी, मार्च अखेरीस खूप गर्दी होते आणि त्यामुळे, त्यासाठी जास्तीत जास्त अतिरिक्त कांऊटर्स उघडण्यात आले तरीही, पोचपावत्या देण्याचा भार सांभाळणे रिझर्व बँकेला कठीण होते.

आय कर थकबाकी देण्यासाठी पुढील एकोणतीस एजन्सी बँकांनी प्राधिकृत करण्यात आले आहे यादी :

1. अलाहाबाद बँक 16. सिंडिकेट बँक
2. आंध्र बँक 17. युको बँक
3. बँक ऑफ बडोदा 18. युनियन बँक ऑफ इंडिया
4. बँक ऑफ इंडिया 19. युनायटेड बँक ऑफ इंडिया
5. बँक ऑफ महाराष्ट्र 20. विजया बँक
6. कॅनरा बँक 21. स्टेट बँक ऑफ इंडिया
7. सेंट्रल बँक ऑफ इंडिया 22. स्टेट बॅंक ऑफ बिकानेर आणि जयपूर
8. कॉर्पोरेशन बँक 23. स्टेट बँक ऑफ हैदराबाद
9. देना बँक 24. स्टेट बँक ऑफ त्रावणकोर
10. आयडीबीआय बँक 25. स्टेट बँक ऑफ म्हैसूर
11. इंडियन बँक 26. स्टेट बँक ऑफ पतियाळा
12. इंडियन ओव्हरसीज बँक 27. एचडीएफसी बँक लिमिटेड
13. ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स 28. अॅक्सिस बँक लिमिटेड
14. पंजाब आणि सिंध बँक 29. आयसीआयसीआय बँक लिमिटेड
15. पंजाब नॅशनल बँक  

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2208

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä