फेब्रुवारी 20, 2017
रुपी सहकारी बँक लि., पुणे ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ
भारतीय रिझर्व बँकेने, फेब्रुवारी 16, 2017 रोजीच्या निदेशानुसार, रुपी सहकारी बँक लि., पुणे ह्यांना दिलेल्या निदेशांना, फेब्रुवारी 22, 2017 ते ऑगस्ट 21, 2017 पर्यंत अशा आणखी सहा महिन्यांसाठी, पुनरावलोकन करण्याच्या अटीवर मुदतवाढ दिली आहे. सुरुवातीला हे निदेश फेब्रुवारी 22, 2013 ते ऑगस्ट 21, 2013 पर्यंत जारी करण्यात आले होते आणि सहा वेळा प्रत्येकी सहा महिन्यांसाठी आणिखी दोन वेळा प्रत्येकी तीन महिन्यांसाठी त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. शेवटची मुदतवाढ, ऑगस्ट 22, 2016 ते फेब्रुवारी 21, 2017 पर्यंत अशी सहा महिन्यांसाठी देण्यात आली होती.
बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35(अ) च्या पोट कलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने हे निदेश जारी केले होते. ह्या निदेशांची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.
रिझर्व बँकेने हे निदेश दिले ह्याचा अर्थ, तिने दिलेला बँकिंग-परवाना रद्द करण्यात आला आहे, असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून, रिझर्व बँक ह्या निदेशात बदल करण्याचा विचार करु शकते.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2245 |