प्रोग्रेसिव सहकारी बँक लि., मुंबई ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु |
फेब्रुवारी 23, 2017
प्रोग्रेसिव सहकारी बँक लि., मुंबई ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु
बँकिंग विनियात्मक अधिनियम, 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 46 (4) सह वाचित, कलम 47ए(1)(बी) च्या तरतुदींखाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने प्रोग्रेसिव सहकारी बँक लि., मुंबई ह्यांना, रु.4.00 लाख (रुपये चार लाख) दंड ठोठावला आहे. हा दंड, नाममात्र सभासदांना कर्ज देणे, एका एनबीएफसीला वित्त सहाय्य करणे व केवायसी नॉर्म्स ह्याबाबत भारतीय रिझर्व बँकेने दिलेल्या सूचनांचे/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्यामुळे लावण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व बँकेने ह्याबाबत वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती. त्यावर वरील बँकेने लेखी उत्तर सादर केले होते आणि त्यावर तोंडी खुलासेही केले होते. ह्या प्रकरणातील सत्य गोष्टी व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेतल्यावर रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघनांना पुष्टि मिळत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2276 |
|