Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (90.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 01/03/2017
राजसमंद नागरी सहकारी बँक लि., राजसमंद ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु

मार्च 1, 2017

राजसमंद नागरी सहकारी बँक लि., राजसमंद ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1)(क) च्या तरतुदींखाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, राजसमंद नागरी सहकारी बँक लि., राजसमंद ह्यांना रु.5.00 लाख (रु. पाच लाख) दंड लावला आहे. हा दंड आरबीआयने पुढील बाबतीत दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याबाबत लावला आहे. (1) कर्जाशी शेअर भांडवलाची जोडणी (2) विहित केलेल्या व्यक्तिगत कर्ज-एक्सपोझर-मर्यादांचा भंग (3) वरील बँकेने विहित केलेल्या मर्यादे पलिकडे अप्रतिभूतित कर्जे दिली आणि एका सीसी खात्यात विहित मर्यादे पलिकडे वारंवार ओडी देऊ केला. (4) नॉन-बँकिंग अॅसेट्स मिळविणे.

वरील बँकेच्या तपासणीमधून मिळालेल्या बाबींवर आधारित, रिझर्व बँकेने, वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती. त्यावर त्या बँकेने लेखी उत्तर सादर केले होते आणि आरबीआयच्या कार्यकारी संचालकांसमोर व्यक्तीगत सुनावणीही केली होती. ह्या प्रकरणातील सत्य व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेतल्यावर, वरील उल्लंघने झाली असून त्याबाबत दंड लावणे आवश्यक आहे असा निष्कर्ष रिझर्व बँकेने काढला.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2328

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä