Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (70.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 07/03/2017
भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक लि., अॅक्सिस बँक लि. आणि पंजाब नॅशनल बँक
ह्यांचेसाठी पर्यवेक्षणीय कॉलेज

मार्च 07, 2017

भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक लि., अॅक्सिस बँक लि. आणि पंजाब नॅशनल बँक
ह्यांचेसाठी पर्यवेक्षणीय कॉलेज

भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक लि., अॅक्सिस बँक लि., आणि पंजाब नॅशनल बँक ह्यांच्या पर्यवेक्षणीय कॉलेजांच्या सभा, मुंबई येथे, फेब्रुवारी 22 ते 24, 2017 येथे संपन्न झाल्या होत्या. भारतीय रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर श्री एस एस मुंदरा ह्यांनी वरील कॉलेजांच्या कार्यक्रमांचे उद्घाटन केले. भारतीय स्टेट बँकेच्या पर्यवेक्षणीय कॉलेज मध्ये, विदेशातील एकोणीस बँकिंग प्राधिकरणातील सहा यजमान पर्यवेक्षकांनी फेब्रुवारी 22, 2017 रोजी भाग घेतला होता. फेब्रुवारी 23, 2017 रोजी, आयसीआयसी बँक लि. आणि अॅक्सिस बँक लि. ह्यांच्या पर्यवेक्षणीय कॉलेजमध्ये, अनुक्रमे, विदेशातील दहा बँकिंग पर्यवेक्षणीय प्राधिकरणांमधील सोळा पर्यवेक्षकांनी आणि सहा प्राधिकरणांमधील दहा पर्यवेक्षकांनी भाग घेतला होता. फेब्रुवारी 24, 2017 रोजी पंजाब नॅशनल बँकेच्या पर्यवेक्षणीय कॉलेजमध्ये पाच विदेशी पर्यवेक्षणीय प्राधिकरणांमधील दहा पर्यवेक्षकांनी भाग घेतला होता. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी), इन्शुअरन्सरेग्युलेटरी अँड डेवलपमेंट ऑथोरिटी (आयआरडीए) आणि पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेवलपमेंट ऑथोरिटी (पीएफआरडीए) ह्यामधील प्रतिनिधींनीही, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक लि., अॅक्सिस बँक लि., व पंजाब नॅशनल बँक ह्यांच्या कॉलेजेसमध्ये भाग घेतला होता ʊ कारण, ह्या बँकांनी चालित वित्तीय गट, भारतीय वित्तीय मार्केटमधील एकापेक्षा अधिक क्षेत्रात कार्यरत असून, वाणिज्य बँकिंग, गुंतवणुक बँकिंग, विमा, पेन्शन फंड व्यवस्थापन ह्यासह मोठ्या व्याप्तीच्या वित्तीय कार्यकृती करत असतात.

कॉलेज ऑफ सुपरवायझर्ससमोर दिलेल्या भाषणात, श्री. मुंदरा ह्यांनी, भारतामधील मॅक्रोइकॉनॉमिक स्थिती, भारतीय रिझर्व बँकेचा विद्यमान पर्यवेक्षकीय दृष्टिकोन, अलिकडील काळात रिझर्व बँकेने अंगिकारलेले पर्यवेक्षकीय उपाय, सायबर सुरक्षेवर दिलेले वाढते लक्ष, अॅसेट क्वालिटीबाबतचे प्रश्न इत्यादींसारखे, भारतीय बँकिंग प्रणालीसाठी अत्यंत महत्वाच्या बाबी, इत्यादींचे सिंहावलोकन केले. पर्यवेक्षकांमध्ये, परस्पर विश्वास आणि चांगले संबंध निर्माण होण्यासाठी, पर्यवेक्षकीय कॉलेजांच्या सभा खूप मदत करतात ह्याचीही डेप्युटी गव्हर्नरांनी दखल घेतली.

श्रीमती अरुंधती भट्टाचार्य, अध्यक्षा, भारतीय स्टेट बँक, श्रीमती चंदा कोचर, एमडी व सीईओ, आयसीआयसीआय बँक लि., श्रीमती शिखा शर्मा, एमडी व सीईओ, अॅक्सिस बँक लि. आणि श्रीमती उषा अनंतसुब्रमण्यन, एमडी व सीईओ, पंजाब नॅशनल बँक ह्यांनी सादरीकरण करुन, निरनिराळ्या यजमान पर्यवेक्षकांच्या, संबंधित बँकांवरील प्रश्नांची उत्तरे दिली.

आरबीआयमधील पर्यवेक्षकीय आणि विनियामक विकास सहभागींबरोबर शेअर करण्यात आले. सहभागी झालेल्यांनीही, ह्या कॉलेजेसमधील सर्वसमान काळजीच्या अनेक प्रश्नांवर आपली मते व्यक्त केली, आणि भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक लि., अॅक्सिस बँक लि. आणि पंजाब नॅशनल बँक ह्यांची उपस्थिती व विदेशातील कार्यकृतींवरील त्यांचे दृष्टिकोन शेअर केले.

विदेशातील भारतीय बँकांच्या, सरहद्दी पलिकडील कार्यकृतींच्या पर्यवेक्षणाचा एक भाग म्हणून, भारतीय रिझर्व बँकेने, सहा प्रमुख बँकांसाठी (भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक लि., अॅक्सिस बँक लि. आणि पंजाब नॅशनल बँक) पर्यवेक्षणीय कॉलेजेस स्थापन केली असून त्यांची उपस्थिती आंतरराष्ट्रीय स्तंरावर लक्षणीय आहे. ह्या पर्यवेक्षणीय कॉलेजेसची मुख्य उद्दिष्टे म्हणजे, पर्यवेक्षकांमध्ये माहितीची अदलाबदल व सहकार्य वृध्दिंगत करणे, बँकिंग ग्रुपच्या रिस्क प्रोफाईलची जाणीव सुधारणे आणि त्याच्याद्वारे आंतरराष्ट्रीय सक्षम बँकांना अधिक परिणामकारक पर्यवेक्षण करण्यास साह्य करणे. ह्या कॉलेजांच्या प्रत्यक्ष सभा प्रत्येक एक सोडून एका वर्षात घेण्यात येतात.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2377

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä