Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (99.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 09/03/2017
नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँक लि., नाशिक, महाराष्ट्र ह्यांना देण्यात आलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ

मार्च 9, 2017

नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँक लि., नाशिक, महाराष्ट्र ह्यांना देण्यात आलेल्या निदेशांना
आरबीआयकडून मुदतवाढ

सप्टेंबर 8, 2015 रोजीच्या निदेशांन्वये, नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँक लि., नाशिक, महाराष्ट्र ह्यांना सप्टेंबर 9, 2015 रोजी व्यवहार बंद झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निदेशांखाली ठेवण्यात आले होते. ह्या निदेशांची वैधता, निदेश दि. मार्च 3, 2016 व ऑगस्ट 25, 2016 अन्वये सहा महिन्यांच्या कालावधीसाठी वाढविण्यात आली होती. ह्याशिवाय, निदेश दि. डिसेंबर 26, 2016 अन्वये, वरील बँकेला, स्थिर ठेवींच्या विरुध्द कर्जांचे समायोजन करण्यास, तसेच काही अटी व शर्तींवर, प्रमाणित कॅश क्रेडिट खात्यांचे नूतनीकरण करण्यास परवानगी देण्यात आली होती. जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येत आहे की, मार्च 3, 2016, ऑगस्ट 25, 2016, आणि डिसेंबर 26, 2016 रोजीच्या निदेशांसह वाचित, निदेश दिनांक सप्टेंबर 8, 2015 चा कार्यकारी कालावधी, आमचे निदेश दि. मार्च 7, 2017 अन्वये, आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे मार्च 10, 2017 ते सप्टेंबर 9, 2017 पर्यंत वाढविण्यात आला आहे.

संदर्भित निदेशाच्या इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.

वरील प्रमाणे असलेली मुदतवाढ अधिसूचित करणा-या, निदेश दि. मार्च 7, 2017 ची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित केली जाईल.

रिझर्व बँकेने वरीलप्रमाणे दिलेल्या मुदतवाढीचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत रिझर्व बँकेची खात्री पटली आहे असा समजला जाऊ नये.

अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2401

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä