मार्च 9, 2017
अलवार अर्बन को ऑपरेटिव बँक लि, अलवार (राजस्थान) ह्यांना आरबीआयकडून निदेश लागु
जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येत आहे की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 56 सह वाचित, कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) अलवार अर्बन को ऑपरेटिव बँक लि., अलवार ह्यांना काही सूचना/निदेश दिले आहेत. त्यानुसार, मार्च 7, 2017 रोजी व्यवहार बंद झाल्यापासून, वरील बँक आरबीआयकडून लेखी पूर्व-मंजुरी घेतल्याशिवाय, कोणतीही कर्जे किंवा अग्रिम राशी देणार नाही किंवा नूतनीकरणही करणार नाही, निधी उधार घेणे व नवीन ठेवी स्वीकारणे ह्यासह कोणतीही नवीन जबाबदारी स्वीकारणार नाही, तिची दायित्वे व वचने पूर्ण करण्यासाठी किंवा अन्यथा कोणतेही प्रदान करणार नाही किंवा प्रदान करण्यास राजी होणार नाही, कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा व्यवस्था ह्या मार्फत, तिच्या मालमत्ता किंवा अॅसेट्सची विक्री, हस्तांतरण किंवा आरबीआय निदेश दि. मार्च 1, 2017 मध्ये अधिसूचित केल्यानुसार सोडल्यास, अन्य प्रकारे वासलात लावू शकणार नाही. ह्याची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे. विशेषतः प्रत्येक बचत खाते, चालु खाते किंवा इतर कोणतेही ठेव खाते ह्यामधील एकूण शिल्लक रकमेमधून, रु.1,000/- (रुपये एक हजार) पर्यंतची रक्कम, (वरील आरबीआय निदेशांमध्ये दिलेल्या अटींवर) काढल्यास परवानगी दिली जावी.
वरील निदेश देण्यात आले असल्याचा अर्थ, आरबीआयने दिलेला बँकिंग परवाना रद्द करण्यात आला आहे असा घेतला जाऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत, ती बँक, निर्बंधांसह बँकिंग-व्यवहार करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून वरील निदेशात बदल करण्याचा विचारही रिझर्व बँक करु शकते.
अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2405
|