Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (98.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 10/03/2017
इंडियन मर्कंटाईल को.ऑपरेटिव बँक लि., लखनौ, युपी
ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ

मार्च 10, 2017

इंडियन मर्कंटाईल को.ऑपरेटिव बँक लि., लखनौ, युपी
ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ

इंडियन मर्कंटाईल को.ऑपरेटिव बँक लि., लखनौ, ह्यांना देण्यात आलेल्या निदेशांना भारतीय रिझर्व बँकेने, मार्च 12, 2017 ते सप्टेंबर 11, 2017 अशी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली, दि. जून 4, 2014 रोजी दिलेल्या निदेशान्वये, वरील बँकेला, जून 12, 2014 पासून निदेशांखाली ठेवण्यात आले आहे.

आरबीआयचे निदेश दि. जुलै 30, 2014; डिसेंबर 8, 2014; जून 2, 2015; सप्टेंबर 7, 2015; ऑक्टोबर 19, 2015; डिसेंबर 7, 2015; मार्च 4, 2016, सप्टेंबर 2, 2016 आणि नोव्हेंबर 25, 2016 अन्वये वरील निदेशांमध्ये बदल करण्यात आला होता/त्याची वैधता वाढविण्यात आली होती. मार्च 11, 2017 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेल्या शेवटच्या निदेशाची वैधता, मार्च 9, 2017 च्या सुधारित निदेशान्वये, पुनरावलोकनाच्या अटींवर, मार्च 12, 2017 ते सप्टेंबर 11, 2017 पर्यंत अशी सहा महिन्यांसाठी वाढविण्यात आली आहे. निदेशांमध्ये बदल करण्यात आले असून त्याच कर्जदाराच्या कर्जाचे समायोजन त्याच्याच ठेवींविरुध्द करण्यास काही अटींवर बँकांना परवानगी देण्यात आली आहे. मार्च 9, 2017 च्या निदेशांची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व बँकेने निदेशात बदल केला ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा किंवा घसरण झाली आहे असा लावण्यात येऊ नये. परिस्थितीवर अवलंबून ह्या निदेशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2428

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä