Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (100.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 30/03/2017
बँकिंग विनियात्मक अधिनियम 1949 (एएसीएस) खाली देण्यात आलेले निदेश - अजिंक्यतारा सहकारी बँक लि., सातारा, महाराष्ट्र

मार्च 30, 2017

बँकिंग विनियात्मक अधिनियम 1949 (एएसीएस) खाली देण्यात आलेले निदेश - अजिंक्यतारा सहकारी बँक लि., सातारा, महाराष्ट्र

अजिंक्यतारा सहकारी बँक लि. सातारा, महाराष्ट्र ह्यांना, निदेश दि. सप्टेंबर 28, 2015 अन्वये, सप्टेंबर 30, 2015 रोजीचे व्यवहार बंद झाल्यापासून निदेशांखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतर देण्यात आलेल्या निदेशांन्वये वरील निदेशांची वैधता वेळोवेळी वाढविण्यात आली होती. शेवटचा निदेश सप्टेंबर 28, 2016 रोजी देण्यात आला आणि तो निदेश, पुनरावलोकनाच्या अटीवर मार्च 30, 2017 पर्यंत वैध होता.

जनतेला सांगण्यात येत आहे की अजिंक्यतारा सहकारी बँक लि., सातारा, महाराष्ट्र ह्यांना, सप्टेंबर 28, 2015 रोजी देण्यात आलेल्या निदेशांची वैधता, आदेश दि. मार्च 20, 2017 अन्वये, पुनरावलोकनाच्या अटीवर, आणखी सहा महिन्यांनी म्हणजे सप्टेंबर 30, 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

वरील निदेशांच्या इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.

मार्च 20, 2017 रोजीचा निदेशाची (वरील बदल असलेली) एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे. भारतीय रिझर्व बँकेने निदेशात बदल केले ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2617

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä