Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (101.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 31/03/2017
कपोल सहकारी बँक लि., मुंबई, महाराष्ट्र् ह्यांचेवर आरबीआयकडून निदेश जारी

मार्च 31, 2017

कपोल सहकारी बँक लि., मुंबई, महाराष्ट्र् ह्यांचेवर आरबीआयकडून निदेश जारी

भारतीय रिझर्व बँकेने (निदेश डीसीबीएस.सीओ.बीएसडी-आय/डी-09/12.22.111/2016-17 दि. मार्च 30, 2017 अन्वये) कपोल सहकारी बँक लि., मुंबई, महाराष्ट्र् ह्यांना निदेशांखाली ठेवले आहे. ह्या निदेशांनुसार, आरबीआयने दिलेल्या निदेशांमधील अटींनुसार, ठेवीदारांना त्यांचे प्रत्येक बचत बँक खाते किंवा चालु खाते किंवा कोणतेही नाव असलेले ठेव खाते ह्यामधील एकूण शिल्लक रकमेमधून, रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) पर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी असेल. भारतीय रिझर्व बँकेकडून लेखी मंजुरी घेतल्याशिवाय कपोल सहकारी बँक लि., कोणतीही कर्जे देऊ शकणार नाही किंवा नूतनीकरण करु शकणार नाही, कोणतीही गुंतवणूक करु शकणार नाही, कर्जे घेऊन व नवीन ठेवी स्वीकारुन कोणतीही दायित्वे घेणार नाही, तिची जबाबदारी किंवा दायित्व पूर्ण करण्यासाठी कोणतेही प्रदान करणार नाही किंवा त्यासाठी राजी होणार नाही, कोणत्याही प्रकारची व्यवस्था किंवा करार करुन, (मार्च 30, 2017 रोजी आरबीआयने अधिसूचित केलेल्या सोडून) तिची कोणत्याही मालमत्ता किंवा अॅसेट्सची विक्री, हस्तांतरण करु शकणार नाही किंवा अन्य प्रकारे वासलात लावू शकणार नाही.

भारतीय रिझर्व बँकेने हे निदेश दिले ह्याचा अर्थ, वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आला आहे असा घेतला जाऊ नये. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत वरील बँक, तिचा बँकिंग व्यवसाय करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून, रिझर्व बँक, ह्या निदेशात बदल करण्याचा विचार करु शकते.

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 35 अ च्या पोटकलम (1) ने दिलेल्या अधिकाराचा वापर करुन हे निदेश जारी करण्यात आले आहेत. ह्या निदेशांची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2631

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä