इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लि. कडून कार्यकृतींचा प्रारंभ |
जानेवारी 30, 2017
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लि. कडून कार्यकृतींचा प्रारंभ
जानेवारी 30, 2017 पासून इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लि. ह्यांनी, एक पेमेंट्स बँक म्हणून कार्यकृती करण्यास सुरुवात केली आहे. भारतामध्ये एक पेमेंट्स बँक म्हणून व्यवसाय करण्यासाठी, भारतीय रिझर्व बँकेने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 22 (1) खाली वरील बँकेला परवाना दिला आहे.
आमचे वृत्तपत्र निवेदन दि. ऑगस्ट 29, 2015 मध्ये घोषित केल्यानुसार, एक पेमेंट्स बँक स्थापन करण्यासाठी तत्वतः मंजुरी देण्यात आलेल्या 11 अर्जदारांपैकी पोस्ट विभाग एक अर्जदार होता.
अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2030 |
|