जानेवारी 16, 2017
ब्रम्हावर्त वाणिज्य सहकारी बँक लि., कानपुर ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ
ब्रम्हावर्त वाणिक्य सहकारी बँक लि., कानपुर ह्यांना दिलेल्या निदेशांना, भारतीय रिझर्व बँकेने, जानेवारी 7, 2017 ते जुलै 6, 2017 पर्यंत अशी आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ पुनरावलोकन करण्याच्या अटीवर दिली आहे. वरील बँक, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ खाली देण्यात आलेल्या निदेशांखाली जुलै 7, 2015 पासून होती. वरील निदेश सुधारित करण्यात आला व त्याची मुदत जानेवारी 6, 2017 पर्यंत वाढविण्यात आली. डिसेंबर 30, 2016 च्या निदेशान्वये ही मुदत जुलै 6, 2017 पर्यंत वाढविण्यात आली. डिसेंबर 30, 2016 रोजीच्या निदेशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.
रिझर्व बँकेने निदेशांमध्ये बदल केला ह्याचा अर्थ, ह्या बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा किंवा घट झाली आहे असा घेण्यात येऊ नये. परिस्थितीवर अवलंबून ह्या निदेशांमध्ये बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1898 |