Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (95.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 11/04/2017
मे. हिंदुजा लेलँड फायनान्स लि., ह्यांना आरबीआयकडून दंड लागु

एप्रिल 11, 2017

मे. हिंदुजा लेलँड फायनान्स लि., ह्यांना आरबीआयकडून दंड लागु

आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 58ब च्या पोटनियम 5(अअ) सह वाचित, कलम 58 जी(1)(ब) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, मे. हिंदुजा लेलँड फायनान्स लि. (ती कंपनी) ह्यांना, रिझर्व बँकेने वेळोवेळी दिलेल्या निदेशांचे/आदेशांचे उल्लंघन केल्याच्या कारणाने, रु.5 लाख (रुपये पाच लाख) दंड लागु केला आहे.

पार्श्वभूमी

डिसेंबर 30, 2015 ते जानेवारी 14, 2016 दरम्यान ह्या कंपनीच्या मार्च 31, 2015 रोजी असलेल्या पुस्तकांची व लेखांची तपासणी, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 (आरबीआय अधिनियम 1934) च्या कलम 45 एन खाली करण्यात आली होती. त्यात असे दिसून आले की, व्याजाची आकारणी व ती कर्जदाराला कळविली जाणे हे काम अपारदर्शक रितीने करण्यात आले होते आणि ते, आरबीआयच्या अधिनियम 1934 च्या कलम 45 एल खाली ह्या बँकेने दिलेल्या उचित आचार संहितेचे उल्लंघन करणारे होते. त्यानुसार जुलै 29, 2016 रोजी ह्या कंपनीला दंड लावण्याबाबत कारणे दाखवा नोटिस (एससीएन) देण्यात आली होती. ह्या एससीएनला कंपनीने दिलेले उत्तर असमाधानकारक होते. आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 58 जी (2) खाली, फेब्रुवारी 22, 2017 रोजी वैय्यक्तिक सुनावणीची संधीही देण्यात आली होती. ह्या प्रकरणातील सत्य व कंपनीने दिलेले उत्तर आणि सुनावणी दरम्यान केलेले वैय्यक्तिक सादरीकरण ह्यांना विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की, छाननीदरम्यान आढळून आलेली उल्लंघने खरोखर झाली असून त्यासाठी ह्या कंपनीला दंड लावणे आवश्यक आहे. त्यानुसार ह्या कंपनीला रु.5 लाख दंड लावण्यात आला.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2741

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä