Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (93.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 23/02/2017
सार्वभौम सुवर्ण रोखे योजना, 2016-17 - मालिका 4 - प्रचालनाची किंमत

फेब्रुवारी 23, 2017

सार्वभौम सुवर्ण रोखे योजना, 2016-17 - मालिका 4 - प्रचालनाची किंमत

भारत सरकारची अधिसूचना एफ क्र.4(16)-डब्ल्यु अँड एम/2016 आणि आरबीआयचे परिपत्रक आयडीएमडी.सीडीडी.क्र.2187/14.04.050/2016-17, दि. फेब्रुवारी 23, 2017 अन्वये, सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2016-17, मालिका 4, फेब्रुवारी 27, 2017 पासून मार्च 3, 2017 पर्यंतच्या कालावधीत, वर्गणीसाठी खुली असेल. ह्या रोख्याची नाममात्र किंमत, ह्या वर्गणीकालाच्या, (म्हणजे फेब्रुवारी 20-23, 2017)(24 फेब्रुवारी हा महाशिवरात्रीमुळे सुट्टीचा दिवस असल्याने) मागील आठवड्यातील, 999 शुध्दतेच्या सोन्याच्या सरासरी बंद भावावर (इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन लि. (आयबीजेए) ह्यांनी प्रसिध्द केलेल्या) आधारित, प्रतिग्राम रु.2943/- एवढी होते. भारतीय रिझर्व बँकेशी सल्लामसलत करुन, भारत सरकारने, ह्या सार्वभौम सुवर्ण रोख्यांवर प्रति ग्राम रु.50/- सूट/सवलत देण्याचे ठरविले आहे. ह्यामुळे, सुवर्ण रोख्याची, ह्या फेरीसाठीची किंमत रु.2893/- (रुपये दोन हजार आठशे त्र्याण्णव) प्रति ग्राम सोन्यासाठी निश्चित केली आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2283

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä