एप्रिल 18, 2017
रॉयल मोनेटरी ऑथोरिटी ऑफ भूतान बरोबर केलेल्या, ‘पर्यवेक्षणीय सहकार्य व पर्यवेक्षणीय माहितीची देवाण-घेवाण’ वरील सामंजस्य करारावर (एमओयु) आरबीआयची स्वाक्षरी
भारतीय रिझर्व बँकेने, रॉयल मोनेटरी ऑथोरिटी ऑफ भूतान बरोबर ‘पर्यवेक्षणीय सहकार्य व पर्यवेक्षणीय माहितीची देवाण-घेवाण’ वर केलेल्या सामंजस्य करारावर (एमओयु) स्वाक्षरी केली.
रॉयल मोनेटरी ऑथोरिटी ऑफ भूतानच्या वतीने, डेप्युटी गव्हर्नर श्री.फाजो दोरजी ह्यांनी, तर भारतीय रिझर्व बँकेच्या वतीने, डेप्युटी गव्हर्नर श्री. एस एस मुंद्रा ह्यांनी ह्या एमओयुवर स्वाक्षरी केली.
भारतीय रिझर्व बँकेने, सहकार्य अधिकतर वाढविण्यासाठी आणि पर्यवेक्षणीय माहिती शेअर करण्यासाठी काही देशांबरोबर सामंजस्य करार, पर्यवेक्षणीय माहितीसाठीचे पत्र आणि सहकार्य-निवेदन करार केले आहेत. आतापर्यंत आरबीआयने असे 39 एमओयु, एक पर्यवेक्षणीय माहिती पत्र आणि एक सहकार्य निवेदन करारावर सह्या केल्या आहेत.
अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2808
|