एप्रिल 26, 2017
दोन प्राधिकृत डीलर बँकांना आरबीआयकडून दंड लागु
फेमा 1999 च्या अहवाल पाठविण्याच्या आवश्यकतांबाबत रिझर्व बँकेच्या सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे, भारतीय रिझर्व बँकेने, पुढील दोन बँकांना दंड लागु केला आहे. ह्या दंडाचा तपशील पुढीलप्रमाणे :
अनुक्रमांक |
बँकेचे नाव |
दंडाची रक्कम (रु. मध्ये) |
1. |
दि हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन लि |
70,000 |
2. |
कोटक महिंद्रा बँक |
10,000 |
भारतीय रिझर्व बँकेने वेळोवेळी दिलेल्या सूचना/निदेश/मार्गदर्शक तत्वे ह्यांची केलेली उल्लंघने विचारात घेऊन, रिझर्व बँकेने, फेमा 1999 च्या कलम 11(3) च्या तरतुदीखाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हे दंड लावण्यात आले आहेत.
भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकांना कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या होत्या आणि त्यावर त्यांनी लेखी उत्तर व मौखिक सादरीकरणही दिले होते. वरील प्रकरणातील सत्य व बँकांनी दिलेली उत्तरे विचारात घेऊन, भारतीय रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की, वरील उल्लंघने सिध्द झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2896
|