Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (102.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 27/03/2017
वित्तीय कारवाई कृती दल (एफएटीएफ) सार्वजनिक निवेदन, दि. फेब्रुवारी 24, 2017

मार्च 27, 2017

वित्तीय कारवाई कृती दल (एफएटीएफ) सार्वजनिक निवेदन, दि. फेब्रुवारी 24, 2017

वित्तीय कारवाई कृती दलाकडून (एफएटीएफ) त्याच्या सर्व सभासदांना आणि इतर अधिकारक्षेत्रांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया (डीपीआरके) च्या अधिकारक्षेत्रामधून सातत्याने निर्माण होत असलेल्या मनी लाँडरिंग आणि दहशतवाद्यांना अर्थसहाय्य करण्या (एमएल/एफटी) बाबतच्या धोक्यांपासून आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालींचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजावेत. इराणच्या अधिकार क्षेत्रातील सभासदांसाठीही, त्यांच्या अधिकार क्षेत्रातील धोक्यांच्या प्रमाणानुसार उपाय योजण्यासाठी कठोर परिश्रम करण्याबाबत एफएटीएफ कृतीशील करणे आवश्यक झाले आहे. ह्याशिवाय एफएटीएफने, आणीबाणी निर्माण करण्याजोग्या त्रुटी असलेली पुढील अधिकार क्षेत्रे निर्देशित केली असून, त्यांचा सामना करण्यासाठी एफएटीएफ बरोबर एक कृती योजनाही तयार केली आहे. हे देश म्हणजे, अफगाणिस्तान, बोस्निया व हर्जेगोविना, इथोपिया, इराक, लाओपीडीआर, सिरिया, युगांडा, वानुआटु व येमेन.

ही सर्व माहिती, एफएटीएफने फेब्रुवारी 24, 2017 रोजी प्रसृत केलेल्या अद्यावत निवेदनात व कागदपत्रात उपलब्ध आहे. हे निवेदन व दस्त पुढील युआरएलवर अॅक्सेस करता येऊ शकते.

1) http://www.fatf-gafi.org/publications/high-riskandnon-cooperativejurisdictions/documents/public-statement-february-2017.html आणि
2) http://www.fatf-gafi.org/publications/high-riskandnon-cooperativejurisdictions/documents/fatf-compliance-february-2017.html

आणीबाणी निर्माण करु शकणा-या, अँटी मनी लाँडरिंग (एएमएल)/दहशतवादाला होणा-या सहाय्याचा सामना (सीएफटी) करण्याबाबतच्या त्रुटी असलेली राज्ये ओळखणे व त्याबाबत काम करणे ह्यासाठी सातत्याने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, आणीबाणी निर्माण करु शकत असलेल्या त्रुटी असलेल्या राज्यांबाबत, एफएटीएफ प्लेनरी “जागतिक एएमएल/सीएफटी अनुपालनाची सततची प्रक्रिया सुधारणे” ह्या नावाचे एक सार्वजनिक निवेदन व दस्त प्रस्तुत करत असते. हे निवेदन आणि दस्त एफएटीएफच्या वेबसाईटवर उपलब्ध असून, ते, विनियमित संस्थांना, त्यात निर्देशित केलेल्या संस्था व राज्यांशी व्यापार व व्यवहार करण्यास रोखत नाही.

एफएटीएफ संबंधाने

वित्तीय कारवाई कृती दल (एफएटीएफ) ही, तिच्या सभासद राज्यांनी 1989 मध्ये स्थापन केलेली एक आंतर-शासकीय संस्था आहे. एफएटीएफची उद्दिष्टे म्हणजे आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालींच्या एकात्मतेला, मनी लाँडरिंग, दहशतवाद्यांचा आणि इतर संबंधित आव्हांनाचा सामना करण्यासाठी मानके ठरविणे, आणि कायदेशीर, विनियामक व कार्यकारी उपायांची अंमलबजावणी करणे. सभासदांची, आवश्यक ते उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यावर एफएटीएफ देखरेख ठेवते, मनी लाँडरिंग व दहशतवाद्यांना अर्थ पुरवठा करण्याबाबतची तंत्रे व त्यावरील उपाय ह्यांचे पुनरावलोकन करते आणि जागतिक दृष्ट्या सुयोग्य उपायांचा स्वीकार व अंमलबजावणी करण्यास प्रोत्साहन देते. एफएटीएफची निर्णय घेणारी बॉडी (म्हणजे एफएटीएफ प्लेनरी) ची सभा वर्षातून तीन वेळा घेतली जाते आणि ही निवेदने अद्यावत केली जातात ह्याची नोंद घेण्यात यावी.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2585

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä