मार्च 22, 2017
बँक ऑफ थायलंड बरोबर, “पर्यवेक्षणीय सहकार्य व पर्यवेक्षणीय माहितीचे आदान प्रदान” वरील सामंजस्य करारावर (एमओयु) आरबीआयची स्वाक्षरी
बँक ऑफ थायलंड बरोबरच्या, “पर्यवेक्षणीय सहकार्य व पर्यवेक्षणीय माहितीचे आदान प्रदान” वरील एका सामंजस्य करारावर (एमओयु) भारतीय रिझर्व बँकेने स्वाक्षरी केली.
बँक ऑफ थायलंड च्या वतीने डॉ. वीराथाई सांचीप्रभोद आणि भारतीय रिझर्व बँकेच्या वतीने गव्हर्नर डॉ. ऊर्जित आर पटेल ह्यांनी ह्या एमओयुवर सह्या केल्या.
अधिकतर सहकार्य वाढविण्यासाठी आणि पर्यवेक्षणीय माहिती शेअर करण्यासाठी, रिझर्व बँकेने, काही देशांच्या पर्यवेक्षकांबरोबर, सामंजस्य करार आणि पर्यवेक्षणीय सहकार्य व सहकार्यांचे निवेदन पत्र ह्याबाबत करार केले आहेत. ह्याप्रमाणे, रिझर्व बँकेने आतापर्यंत असे 38 सामंजस्य करार, एक पर्यवेक्षणीय सहकार्य पत्र व एक सहकार्य निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2531 |