मार्च 22, 2017
एप्रिल 1, 2017 पासून भारतीय महिला बँक लि. च्या शाखा, एसबीआयच्या शाखा म्हणून काम करणार
एप्रिल 1, 2017 पासून, भारतीय महिला बँक लि. च्या सर्व शाखा, भारतीय स्टेट बँकेच्या शाखा म्हणूनच कार्य करतील. भारतीय महिला बँक तिचे ठेवीदारांसह तिच्या ग्राहकांनाही, एप्रिल 1, 2017 पासून, भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक समजण्यात येईल.
भारत सरकारने, अॅक्विझिशन ऑफ भारतीय महिला बँक लि. आदेश 2017 दिले आहेत. मार्च 20, 2017 रोजी भारत सरकारने दिलेले आदेश, भारतीय स्टेट बँक अधिनियम, 1955 (1955 चा 23) च्या कलम 15 च्या पोटकलम (2) अन्वये भारतीय महिला बँक लि. च्या अॅक्विझिशनची मंजुरी, भारतीय राजपत्राच्या एक्स्ट्रॉऑर्डिनरी, भाग-2, कलम 3, पोटकलम (1) खाली प्रसिध्द करण्यात आले आहेत.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2535
|