पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडकडून कार्यकृतींचा प्रारंभ |
मे 23, 2017
पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडकडून कार्यकृतींचा प्रारंभ
मे 23, 2017 पासून पेटीएम पेमेंट्स बँक लि. ह्यांनी, एक प्रदान बँक म्हणून कार्यकृती सुरु केल्या आहेत. भारतामध्ये प्रदान बँकेचा व्यवसाय करण्यासाठी, भारतीय रिझर्व बँकेने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 22(1) खाली, वरील बँकेला परवाना दिला आहे.
ऑगस्ट 19, 2015 रोजीच्या वृत्तपत्र निवेदनात घोषित केल्यानुसार, पेमेंट्स बँक स्थापन करण्यासाठी तत्वतः मंजुरी देण्यात आलेल्या 11 अर्जदारांमध्ये श्री. विजय शंकर शर्मा एक अर्जदार होते.
अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/3148 | |