Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (102.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 26/04/2017
“अलाहाबाद हायकोर्टाच्या 150 वा वर्धापन दिना” निमित रु.5 ची नाणी प्रसृत

एप्रिल 26, 2017

“अलाहाबाद हायकोर्टाच्या 150 वा वर्धापन दिना” निमित रु.5 ची नाणी प्रसृत

वर निर्देशित केलेली नाणी भारत सरकारने तयार केली असून ती भारतीय रिझर्व बँकेकडून लवकरच प्रसारात आणली जातील.

वित्त मंत्रालय, आर्थिक व्यवहार विभाग, नवी दिल्ली, ह्यांनी दिलेल्या, भारतीय राजपत्र - असाधारण - विभाग 2 - कलम 3- पोटकलम(1)-जीएसआर 191(ई) दि. फेब्रुवारी 23, 2016 मध्ये अधिसूचित केल्याप्रमाणे ह्या नाण्यांचे डिझाईन पुढीलप्रमाणे आहे.

दर्शनी बाजू

नाण्याच्या पृष्ठभागावर मध्यभागी, अशोक स्तंभावरील सिंह मुद्रा व त्याखाली ‘सत्यमेव जयते’ ही अक्षरे, डावीकडील कडेला देवनागरी मध्ये ‘भारत’ व उजवीकडील कडेला इंग्रजीमध्ये INDIA कोरलेले असेल. सिंह मुद्रेच्या खाली रुपयाचे चिन्ह "" व नाण्याचे मूल्य ‘5’ हे आंतरराष्ट्रीय अंकात असेल.

मागील बाजू

नाण्याच्या ह्या पृष्ठभागावर, ‘पुस्तकामधून अलाहाबाद हायकोर्टाच्या इमारतीचा दर्शनी मध्य भाग बाहेर येत असल्याची’ प्रतिमा असेल. नाण्याच्या ह्या पृष्ठभागावरील वरच्या कडेजवळ ‘इलाहाबाद उच्च न्यायालय का 150 वा वार्षिकोत्सव’ देवनागरी मध्ये, आणि खालच्या कडेजवळ, ‘150 th ANNIVERSARY OF ALLAHABAD HIGH COURT‘ कोरलेले असेल. प्रतिमेच्या खालच्या बाजूस 1866-2016 ही वर्षे इंग्रजी अंकात असतील.

कॉईनेज अधिनियम, 2011 मध्ये दिल्यानुसार ही नाणी वैध चलन असून ह्याच मूल्यातील विद्यमान नाणीही वैध चलन असणे सुरुच राहील.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2903

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä