एप्रिल 26, 2017
“नॅशनल आर्काइव्ज ऑफ इंडियाच्या 125 व्या वर्षाच्या” प्रसंगी रु.10 ची नाणी प्रसृत
वर निर्देशित केलेली नाणी भारत सरकारने तयार केली असून ती भारतीय रिझर्व बँकेकडून लवकरच प्रसारात आणली जातील.
वित्त मंत्रालय, आर्थिक व्यवहार विभाग, नवी दिल्ली, ह्यांनी दिलेल्या, भारतीय राजपत्र - असाधारण - विभाग 2 - कलम 3, पोटकलम(1)-जीएसआर 197(ई) दि. फेब्रुवारी 26, 2016 मध्ये अधिसूचित केल्याप्रमाणे ह्या नाण्यांचे डिझाईन पुढीलप्रमाणे आहे.
दर्शनी बाजू
नाण्याच्या पृष्ठभागावर मध्यभागी, अशोक स्तंभावरील सिंह मुद्रा व त्याखाली ‘सत्यमेव जयते’ ही अक्षरे, डावीकडील कडेला देवनागरी मध्ये ‘भारत’ व उजवीकडील कडेला इंग्रजीमध्ये INDIA कोरलेले असेल. सिंह मुद्रेच्या खाली रुपयाचे चिन्ह "₹" व नाण्याचे मूल्य ‘10’ हे आंतरराष्ट्रीय अंकात असेल.
मागील बाजू
ह्या बाजूवरील पृष्ठभागावर, मध्यभागी ‘नॅशनल आर्काइवज् बिल्डिंग’ ची प्रतिमा व ह्या प्रतिमेखाली, ‘125 वर्ष/ YEARS कोरलेले असेल. मध्यभागी व ‘नॅशनल आर्काइवज् बिल्डिंग’च्या प्रतिमेच्या वर, 125 व्या वर्धापन समारंभ लिहिलेले असेल. ह्या नाण्याच्या ह्या बाजूवरील वरच्या कडेजवळ देवनागरीमध्ये ‘राष्ट्रीय अभिलेखागार’ आणि खालच्या कडेजवळ “NATIONAL ARCHIVES OF INDIA” इंग्रजीमध्ये असेल. तसेच ह्या नाण्याच्या वरच्या व खालच्या कडेजवळ अनुक्रमे ‘1891’ व ‘2016’ ही वर्षे इंग्रजीत लिहिलेली असतील. आंतरराष्ट्रीय अंकांमधील ‘1916’ व ‘2016’ ही वर्षे, प्रतिमेच्या वरच्या बाजूस अनुक्रमे डावीकडे व उजवीकडे असतील.
कॉईनेज अधिनियम, 2011 मध्ये दिल्यानुसार ही नाणी वैध चलन असून ह्याच मूल्यातील विद्यमान नाणीही वैध चलन असणे सुरुच राहील.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2908
|