मे 4, 2017
प्राधीकृतता प्रमाणपत्राचे रद्दीकरण - मेसर्स बीम मनी प्रा. लि.
प्रदान व समायोजन प्रणाली अधिनियम, 2007 खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, पुढील पेमेंट सिस्टिम ऑपरेटरचे (पीएसओ) प्राधिकृतता प्रमाणपत्र (सीओए), त्या कंपनीने स्वेच्छेने स्वाधिकृतता परत/सादर केल्यामुळे रद्द केले आहे.
कंपनीचे नाव |
पंजीकृत कार्यालयाचा पत्ता |
सीओए क्र व तारीख |
प्राधिकृत प्रदान प्रणाली |
रद्दीकरण दिनांक |
बीम मनी प्रा. लि., नवी दिल्ली (पूर्वी सुविधा स्टारनेट प्रा.लि. ह्या नावाने प्राधिकृत). |
एंटरप्राईज, डी-128-129, ओखला इंडस्ट्रियल एरिया, फेज-1 (402, टेरेस फ्लोअर), नवी दिल्ली -110020. |
44/2011
20.05.2011 |
प्रिपेड कार्ड देणे |
4.5.2017 |
हे सीओए रद्द करण्यात आल्यानंतर, वरील कंपनी प्रिपेड कार्ड देण्याचा व्यवसाय करु शकत नाही. तथापि, एक पीएसओ म्हणून, मेसर्स बीम मनी प्रा. लि. ह्यांचेवर वैध दावा (असल्यास) असलेले ग्राहक किंवा व्यापारी, ह्या रद्दीकरण तारखेच्या दोन वर्षांच्या आत, म्हणजे 3-5-2019 पर्यंत, त्यांच्या संबंधित दाव्यांच्या तडजोडीसाठी वरील कंपनीकडे जाऊ शकतात.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2981 |