नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्स्फर (एनईएफटी) प्रणाली मध्ये अतिरिक्त समायोजन बॅचेस समाविष्ट करण्यास सुरुवात |
मे 8, 2017
नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्स्फर (एनईएफटी) प्रणाली मध्ये अतिरिक्त समायोजन बॅचेस
समाविष्ट करण्यास सुरुवात
भारतीय रिझर्व बँकेने, तिच्या प्रथम द्वैमासिक नाणेविषयक धोरण (2017-18) मध्ये, सक्षमता वाढविण्यासाठी व ग्राहकांची अधिक सोय होण्यासाठी, एनईएफटी प्रणालीमध्ये अतिरिक्त समायोजने सुरु करण्याची घोषणा केली आहे. अर्ध्या तासाची मध्यंतरे असलेली ही 11 अतिरिक्त समायोजने, जुलै 10, 2017 (सोमवार) पासून सकाळी 8.30, 9.30, 10.30 …….. संध्याकाळी 5.30 व 6.30 ह्या वेळी केली जातील व त्या दिवसामधील अर्ध्या तासांचे मध्यांतर असलेल्या समायोजनाची संख्या 23 होईल. सकाळी 8.00 वाजता सुरु होणा-या व संध्याकाळी 7.00 वाजता बंद होणा-या समायोजन बॅचेस पूर्ववत सुरु असतील. रिटर्न डिसिप्लीनरी, विद्यमान पध्दतीनुसार पूर्वीप्रमाणेच (म्हणजे, बी + 2 तास (समायोजन बॅचची वेळ + 2 तास)) असेल.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/3010 | |