जून 2, 2017
वित्तीय साक्षरता कोडे/चाचणी/क्वीझ
वित्तीय साक्षरतेच्या महत्वावर जोर देण्यासाठी, भारतीय रिझर्व बँकेकडून सर्व देशभरात जून 5 ते 9, 2017 हा वित्तीय साक्षरता सप्ताह म्हणून पाळला जात आहे. ह्या आठवड्यामध्ये चार स्थूल अशा विषयांवर जोर दिला जाईल, म्हणजे, तुमचा ग्राहक जाणा (केवायसी), कर्जाची शिस्त पाळणे, तक्रार निवारण व डिजिटल होणे (युपीआय व *99#) ह्या आठवड्या दरम्यान, वित्तीय साक्षरता केंद्रे (एफएलसी) व ग्रामीण बँका, विशेष शिबिरे आयोजित करतील आणि देशातील बँक शाखा, शाखा परिसरात सामान्य विषयांवरील पोस्टर्स प्रदर्शित करतील. देशभरातील एटीएम्सच्या स्क्रीन्सवर आणि त्यांच्या वेबसाईटच्या होमपेजवर बँका, प्रत्येक दिवशी एक वित्तीय साक्षरता संदेश प्रदर्शित करतील.
वित्तीय साक्षरता सप्ताहामधील कार्यकृतींचा एक भाग म्हणून वित्तीय साक्षरतेबाबत कुतुहल व जाणीव निर्माण करण्यासाठी, जनतेसाठी एक ऑनलाईन कोडेही आयोजित करण्यात आले आहे.
ह्या कोड्यामध्ये भाग घेणे, http://finlitweek.ncfeindia.org/ ह्या लिंकमधून ऑनलाईन पंजीकरण प्रक्रियेतूनच करता येईल.
ह्या मध्ये भाग घेण्यास जनतेला आमंत्रित केले जात आहे.
जोस जे कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/3256
|