जून 5, 2017
जालोर नागरिक सहकारी बँक लि., जालोर ह्यांचेवर
आरबीआयकडून दंड लागु
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असल्यानुसार) कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1)(क) खालील तरतुदींनी तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, जालोर नागरिक सहकारी बँक लि., जालोर ह्यांना रु.5.00 लाख (रुपये पाच लाख) दंड ठोठावला असून, हा दंड, आरबीआयने पुढील संबंधात दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याबाबत लावण्यात आला आहे (1) आंतर बँकीय एकल व एकूण एक्सपोझर मर्यादांचा भंग आणि (2) विहित केलेल्या मर्यादेबाहेर देणग्या देणे.
वरील बँकेच्या तपासणीमधून मिळालेल्या माहितीच्या आधाराने, भारतीय रिझर्व बँकेने, वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने लेखी उत्तर व वैय्यक्तिक जबाबही आरबीआयच्या कार्यकारी संचालयांसमोर सादर केला होता. ह्या प्रकरणातील सत्य व त्याबाबत वरील बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की, वरील उल्लंघने झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/3281 |