Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (97.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 14/06/2017
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ खालील निदेश – सन्मित्र सहकारी बँक मर्यादित, मुंबई, महाराष्ट्र

जून 14, 2017

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ खालील निदेश –
सन्मित्र सहकारी बँक मर्यादित, मुंबई, महाराष्ट्र

सन्मित्र सहकारी बँक मर्यादित, मुंबई, ह्यांना जून 14, 2016 रोजी व्यवहार बंद झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निदेश दि. जून 14, 2016 अन्वये निदेशांखाली ठेवण्यात आले होते. आदेश दि. डिसेंबर 7, 2016 अन्वये ह्या निदेशांचा कालावधी सहा महिन्यांसाठी वाढविण्यात आला होता. जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, निदेश दि. डिसेंबर 7, 2016 सह वाचित, निदेश दि. जून 14, 2016 चा कार्यकाल, निदेश दि. जून 8, 2017 अन्वये, आणखी तीन महिन्यांसाठी (जून 15, 2017 ते सप्टेंबर 14, 2017 पर्यंत), पुनरावलोकनाच्या अटीवर वाढविण्यात आला आहे.

संदर्भित निदेशामधील इतर अटींमध्ये कोणताही बदल नाही.

जून 8, 2017 रोजीच्या निदेशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

रिझर्व बँकेने केलेल्या वरील बदलाचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.

अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/3375

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä