जून 22, 2017
रिझर्व बँकेकडून पर्यवेक्षक समितीच्या सभासदांची नावे जाहीर
बँकिंग विनियामक अधिनियम (सुधारणा) वटहुकुम 2017 जाहीर झाल्यानंतर उचलण्यात आलेली व विचाराधीन असलेली पाऊले निर्देशित करणा-या, रिझर्व बँककडून प्रसिध्द केलेल्या वृत्तपत्र निवेदन, मे 22, 2017 मध्ये, इतर बाबींबरोबर, विस्तारित मँडेटसह पर्यवेक्षक समितीची (ओसी) पुनर्रचनाही निर्देशित करण्यात आली होती.
त्यानंतर रिझर्व बँकेने ही ओसी तिच्या छत्राखाली घेतली आहे. सध्या, ह्या ओसीमध्ये अध्यक्षासह पाच सभासद असून, ती आवश्यक त्यानुसार व अध्यक्षांनी तयार केलेल्या अनेक खंडपीठांमार्फत, बँकांनी संदर्भित केलेल्या प्रकरणांवर मतप्रदर्शन करील. ह्या ओसीची रचना पुढीलप्रमाणे असेल.
(1) श्री. प्रदीप कुमार (अध्यक्ष)
(2) श्री. जानकी वल्लभ
(3) श्री. एम बी एन राव
(4) श्री. वाय एम देवस्थळी
(5) श्री. एस रामन (सप्टेंबर 7, 2017 पासून)
ही पुनर्रचित समिती, सस्टेनेबल स्ट्रक्चरिंग ऑफ स्ट्रेस्ड् अॅसेट्स योजनेसाठी (एस4 ए) पुनर्रचित करण्यात येणा-या प्रकरणांव्यतिरिक्त, जेथे कर्ज घेणा-या संस्थेबाबत बँकिंग क्षेत्राचे एकूण एक्सपोझर रु.500 कोटीपेक्षा जास्त आहे अशी इतर प्रकरणे सोडविण्यासाठी, विस्तारित मँडेट तयार करील.
वरील बदल, आणि सहा महिन्यांमधील ओळखण्यात आलेल्या स्ट्रेस्ड् अॅसेट्सची प्रकरणे सोडविण्यासाठी बँकांनी अनुसरावयाच्या प्रक्रियांचा तपशील बँकांना कळविण्या संबंधीचे परिपत्रक वेगळ्याने पाठविले जाईल.
जोस जे कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/3454 |